बातमी – स्वच्छ भारत अभियान च्या महाराष्ट्र राज्य संघटन सरचिटणीस पदी ॲड. संजय सावंत पाटील यांची निवड करण्यात आली. विधानसभा 2019 निवडणूकीत भारतीय जनता पार्टी मध्ये ॲड. संजय दत्ताञय सावंत (पाटील) यांनी प्रवेश केला होता तसेच पार्टीमध्ये सर्कीय कार्यक्रर्ता म्हणून काम करत आहेत पार्टीने जिल्हा कमिटी मध्ये दखल घेऊन त्यांना भाजपा कायदा आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी जबाबदारी दिली आहे. गेली दिड वर्षापासून भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा वकील आघाडीचे नेतृत्व करत पार्टीमध्ये निष्ठेने काम करत असताना असेच काम महाराष्ट्र राज्यात स्वच्छ भारत अभियान चे काम प्रत्येक जिल्हा, तालुका, शहरात, गावोगावी प्रामाणिकपणे करतील याच अपेक्षेने अभियान मध्ये दखल घेऊन ॲड संजय सावंत पाटील यांना संघटन वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य संघटन सरचिटणीस जबाबदारी दिली आहे…
ॲड. संजय दत्ताञय सावंत (पाटील) हे अनेक सामाजिक संस्था व संघटना भारतीय मिडीया फाऊंडेशन, अँन्टि करप्शन कमिटी, शिवक्रांती युवा परिषद, जगदंब सामाजिक प्रतिष्ठान, माहिती सेवा समिती मध्ये महाराष्ट्र राज्य प्रदेश कमिटी मध्ये गेल्या 15 वर्षापासुन सामाजिक कामात सर्कीय आहे, तसेच राजकीय दृष्ट्या पाहिले तर आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश माजी सहसचिव म्हणून तसेच इंडियन ओसनिक पार्टी महाराष्ट्र माजी प्रदेश अध्यक्ष म्हणून सुध्दा काम पाहिले आहे.
द एमराल्ड रिसोर्ट हाँल, सोमटणी फाटा, मावळ, पुणे याठिकाणी स्वच्छ भारत अभियान महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारणी ची निवड करण्यात आली. स्वच्छ भारत अभियान प्रमुख कार्यकारणी, लोकसभा, विधानसभा, जिल्हा तालुका, शहर अध्यक्ष व सरचिटणीस, संयोजक व सहसंयोजक, जिल्हा कार्यकारणी सदस्य, विशेष निमंत्रित इत्यादी नियुक्तीपत्र देण्यात आली.
याप्रसंगी स्वच्छ भारत अभियान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री सचिन गजानन देशपांडे, स्वच्छ भारत अभियान महाराष्ट्र राज्य संयोजक मा. श्री धनंजय दगडे पाटील उपस्थित होते. ॲड.संजय सावंत पाटील यांनी उपस्थितीना संबोधणताना सांगितले की भारत सरकार व भारतीय जनता पार्टी ध्येयधोरणानुसार संपुर्ण महाराष्ट्राभर चांगली टिम बनवून अभियानची संकल्पना सर्वसामान्य पर्यत पोहचवणार प्रत्येक वस्ती, गाव, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आव्हान करेन असा विश्वास दिला. या कार्यक्रमात शारीरिक अंतर पाळले गेले, तसेच मास्क, सॅनिटायझर इत्यादींचा वापर करण्यात आला.
अमीत मैसुरिया TODAY 9SANDESH NEWS